अमेरिकेत मोठी दुर्घटना, दोन विमानांची हवेत टक्कर

अमेरिकेत मोठी विमान दुर्घटना समोर आली आहे. कोलोरॅडो विमानतळावर दोन विमानांची हवेत टक्कर झाली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. दोन्ही पायलट लँडिंग करण्याचा प्रयत्न करत असताना दोन लहान विमाने हवेत आदळली.

सेस्ना 172 आणि एक्स्ट्रा ईए-300 ही दोन्ही विमाने लँडिंगचा प्रयत्न करत असताना एकमेकांवर आदळली. मॉर्गन काउंटी शेरीफ ऑफिसच्या म्हणण्यानुसार, एक्स्ट्रा ईए-300 मध्ये प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. अन्य एक प्रवासी जखमी झाला असून त्या उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सेस्ना 172 मध्ये प्रवास करणाऱ्या लोकांना किरकोळ दुखापतींसाठी घटनास्थळीच उपचार देण्यात आले. अपघातानंतर एका विमानाला आग लागल्याचे शेरीफ कार्यालयाने सांगितले. एफएए आणि राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ या घटनेची चौकशी करणार आहेत.