महिलांसाठी कर्करोग तपासणी शिबीर

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून कर्करोग पेशंट एड असोसिएशन (सीपीएए) व बेस्ट उपक्रमांतर्गत त्यांच्या गुलाबी ऊर्जा प्रकल्पांतर्गत आज 8 मार्च रोजी दादर वर्कशॉप व 9 मार्च रोजी कुलाबा हेड ऑफिस येथे कर्करोग तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. दुपारी 3 वाजेपर्यंत 200 महिलांसाठी हे शिबीर असणार आहे. यात बेस्ट परिवहन सेवेच्या ज्या बसवाहन महिलांनी कोवीडच्या कालावधीत दिवस-रात्र आपली सेवा बजावली आहे त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कर्करोग पेशंट एड असोसिएशन (सीपीएए) 1969 पासून हिंदुस्थानातील गरीब आणि गरजू पीडितांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे. ‘कर्करोगाचे संपूर्ण व्यवस्थापन’ व्याख्यानांद्वारे कर्करोगाविषयी जागरूकता वाढवण्यापासून, आमच्या क्लिनिकमध्ये किंवा साइटकर स्क्रिनिंगद्वारे लवकर निदान करण्यास ही संस्था प्रोत्साहित करते.

आपली प्रतिक्रिया द्या