आता इंटरनेट वापरा बिनधास्त, जिओ फायबरची नवी ऑफर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिलायन्स कंपनीने नुकतीच नवीन जियो फायबर प्लॅन्सची घोषणा केली आहे. यात नव्या ग्राहकांना अनलिमिटेड इंटरनेट आणि मनोरंजनाचा मनमुराद आनंद ग्राहकांना मिळणार आहे. हे चार नवीन प्लॅन 5 सप्टेंबरपासून ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. 399 पासून 1499 रुपयांपर्यंत हे प्लॅन असून कंपनी आपल्या ग्राहकांना 1 महिन्यांचे मोफत ट्रायल पॅक देणार आहे. त्यात ग्राहकांना 150 एमबीपीएस स्पीड मिळणार आहे. याशिवाय ग्राहकांना 4 के सेट टॉप बॉक्स आणि 10 ओटीटी ऍप्सचे मोफत सबक्रीप्शन देखील मिळणार आहे.