महिला क्रिकेटच्या मुख्य प्रशिक्षकाची आज निवड; कपिल देव, अंशुमन गायकवाड मुंबईत दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

अनुभवी खेळाडू मिताली राज हिच्यासोबत वाद झाल्यामुळे रमेश पोवार याचा हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघासोबत असलेला प्रशिक्षकपदाचा करार वाढवण्यात आला नाही. त्यानंतर ‘बीसीसीआय’ने नव्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले. कपिलदेव, अंशुमन गायकवाड व शांता रंगास्वामी यांच्या अॅड हॉक समितीवर नव्या प्रशिक्षक निवडीची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे आज होणाऱ्या मुलाखतींसाठी कपिल देव आणि अंशुमन गायकवाड मुंबईत दाखल झाले.

या पदासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींच्या मुलाखती आज घेण्यात येणार असून यामध्ये दक्षिण आफ्रिकेचे गॅरी कर्स्टन, हर्शेल गिब्स व हिंदुस्थानचा रमेश पोवार यांच्यात रस्सीखेच असणार आहे, असे बोलले जात आहे.