
ऑडिओ कॅसेटचे जनक लोऊ ओटेन्स यांचे नुकतेच निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. 1963 साली त्यांनी पहिली कॅसेट तयार केली होती. ऑडिओ कॅसेटमुळे ओटेन्स यांनी लोकांना चालता-फिरता संगीत ऐकण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून आतापर्यंत जगात 10 हजार कोटी कॅसेट विकल्या गेल्याचा अंदाज आहे.
ओटेन्स यांनी नेदरलॅण्डस येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. 1960 साली फिलीप्सच्या प्रॉडक्ट हेड विभागाचे ते प्रमुख होते. ओटेन्स यांच्यावर मोठय़ा रिल टेपरेकॉर्डरचे पोर्टेबल गँझेटमध्ये रूपांतर करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. यातूनच ऑडिओ कॅसेटचा जन्म झाला.
30 ऑगस्ट 1963 रोजी वयाच्या 30 व्या वर्षी ओटेन्स यांनी बर्लिन येथे ऑडिओ पँसेट जगासमोर सादर केली. 2013 मध्ये कॅसेटला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ओटेन्स यांनी एका मुलाखतीत सांगितले, ‘फिलिप्स आणि सोनीसोबत करार झाल्यावर कॅसेट मांडेलला पेटंट मिळाले. मात्र 1979 साली सोनीने वॉकमन बाजारात आणल्यावर कॅसेटला खऱया अर्थाने प्रसिद्धी मिळाली.





























































