हिंदुस्थान-इस्रायल गुंतवणूक करार

ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर मोदी सरकारची पळापळ सुरू झाली आहे. ब्रिटननंतर आता हिंदुस्थानने इस्रायलशी नवा गुंतवणूक करार केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या करारावर स्वाक्षरी केली. दोन्ही देशांतील आर्थिक सहकार्य वाढवणे हा कराराचा उद्देश आहे. या करारामुळे दोन्ही देशांनी संभाव्य मुक्त व्यापार कराराची पायाभरणी केल्याचे बोलले जात आहे.