आयएनएक्स मीडिया प्रकरण,सिंधुश्री खुल्लर यांच्या जामिनाच्या मुदतीत वाढ

303

आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात ‘नीती’ आयोगाच्या माजी सीईओ सिंधुश्री खुल्लर व इतर आरोपींच्या अंतरिम जामिनाची मुदत दिल्ली न्यायालयाने 27 जानेवारीपर्यंत वाढवली आहे. मंगळवारच्या सुनावणीवेळी सीबीआयने आरोपींच्या जामीन अर्जावर आक्षेप नोंदवला. त्यावर आरोपींची बाजू मांडण्यासाठी न्यायालयाने आरोपींच्या वकिलांना वेळ दिला आहे. खुल्लर यांच्यासह सहा आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला आहे, मात्र या आरोपींना जामीन मंजूर केल्यास ते पुराव्यांमध्ये फेरफार करतील असे म्हणणे मांडत मंगळवारी सीबीआयने जामीन अर्जाला तीक्र विरोध केला. यावर आरोपींची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील सिद्धार्थ लुथ्रा आणि विकास कुमार पाठक यांनी वेळ मागितला. त्याची दखल घेत विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहार यांनी आरोपींच्या अंतरिम जामिनाची मुदत 27 जानेवारीपर्यंत वाढवली.

आपली प्रतिक्रिया द्या