IPL 2020 – 437 दिवसांनी मैदानात उतरलेल्या धोनीचा पराक्रम, अशी कामगिरी करणारा पहिला कर्णधार व विकेटकीपर

इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात अबुधाबी येथे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील लढतीने झाली. या लढतीत 437 दिवसांनी मैदानात पाऊल ठेवलेल्या एम.एस. धोनीवर सर्वांच्या नजरा होत्या. धोनीने देखील ही वाया जाऊ दिली नाही आणि नवीन विक्रमाला गवसणी घातली. या लढतीत चेन्नईच्या संघाने मुंबईला पराभूत केले. यासह आयपीएलमध्ये कोणत्याही एका संघाचे नेतृत्व करताना 100 विजय मिळणारा धोनी पहिला कर्णधार ठरला.

IPL 2020 – सोशल मीडियावर पांड्याची उडतेय खिल्ली, ‘हे’ 10 खेळाडूही झालेत ‘हिटविकेट’

आयपीएलमध्ये धोनी असा एकमेव कर्णधार आहे ज्याच्या नेतृत्वाखाली कोणत्याही संघाने 100 विजय मिळवला आहेत. धोनीने 161 लढतीत चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व केले आहे. यात त्याला 100 विजय मिळवता आले, तर 60 लढतीत पराभव स्वीकारावा लागला. धोनीच्या यशाची टक्केवारी 60 टक्के असून याबाबतीत देखील तो इतर संघाच्या कर्णधारांहुन उजवा आहे. यासह त्याने 5 लढती पुणे संघाचे नेतृत्व करताना जिंकल्या आहे.

IPL 2020 – पहिलीच मॅच अन डू प्लेसिसचा सुपर कॅच, तुम्ही पाहिलात का?

100 कॅच आणि 250 शिकार
दरम्यान, धोनीने यासह आयपीएलमध्ये 100 कॅच घेण्याचाही विक्रम केला आहे. 100 पैकी 95 कॅच त्याने यष्टीमागे तर 5 कॅच क्षेत्ररक्षण करताना पकडले आहेत. तसेच टी-20 क्रिकेटमध्ये यष्टीमागे 250 शिकार करणारा पहिला यष्टीरक्षक बनण्याचा मान धोनीला मिळाला आहे.

IPL 2020 – ‘हिटमॅन’ला बाद करत चावलाचा विक्रम, टॉप 3 विकेट टेकर गोलंदाजात ‘एन्ट्री’

आपली प्रतिक्रिया द्या