IPL 2020 – ‘हिटमॅन’ला बाद करत चावलाचा विक्रम, टॉप 3 विकेट टेकर गोलंदाजात ‘एन्ट्री’

जवळपास दीड वर्षाच्या कालावधीनंतर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सुरू झाले. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघात पहिला सामना रंगला. या लढतीत चेन्नईच्या संघाने बाजी मारली. चेन्नईने मुंबईचा 5 विकेट्सने पराभव गेला. या लढतीत पहिली विकेट घेण्याचा मान फिरकीपटू पियुष चावला याने मिळवला आणि याच विकेटच्या बळावर त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांची यातील तिसरे स्थान पटकावले.

Photo – IPL मध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे टॉप 5 खेळाडू

नाणेफेक जिंकल्यानंतर या लढतीत चेन्नईच्या संघाने मुंबईला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले. रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक याने 4 षटकात 10 च्या सरासरीने धुलाई करत चांगली सुरुवात केली. याच दरम्यान धोनीने चेंडू पियुष चावला याच्या हातात दिला. त्याने मुंबईचा कर्णधार हिटमॅन रोहित शर्मा याचा अडसर दूर केला. पियुष चावला याची आयपीएल कारकीर्दमधील ही 151 वी विकेट होती.

IPL 2020 – पहिलीच मॅच अन डू प्लेसिसचा सुपर कॅच, तुम्ही पाहिलात का?

या विकेटच्या बळावर त्याने सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे. त्याने हरभजन सिंग याचा 150 विकेटच्या विक्रमाला मागे टाकले. आता पियुष चावला याच्या पुढे लसीथ मलिंगा (170 विकेट्स) आणि अमित मिश्रा (157 विकेट्स) हे दोन गोलंदाज आहेत. मलिंगा यंदा आयपीएल खेळत नसल्याने चावला आणि मिश्रा या दोघांना त्याला ओव्हरटेक करण्याची संधी आहे.

IPL 2020 – सर्वाधिक वेळा रनआउट झालेले टॉप 5 खेळाडू, ‘या’ चपळ खेळाडूचे वाचून व्हाल अवाक

आपली प्रतिक्रिया द्या