कराळे मास्तरांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नितेश कराळे मास्तर यांनी बंडखोर केल्याने त्यांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादीने काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अभिजीत वंजारी यांना पाठिंबा दिला आहे.

 राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत अधिकृत पत्रक जारी केले आहे. नागपूर पदवीधर निवडणुकीत पक्षाच्या निर्णयाचा विरोधात जाऊन अपक्ष उमेदवारी अर्ज भरणे आणि आपल्याला शरद पवार यांचा आशीर्वाद निवडणुकीत असल्याचा संभ्रम निर्माण केल्याप्रकरणी कराळे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. नितेश कराळे गुरुजी यांनी गेल्या काही दिवसांत आघाडीविरोधात प्रचार केला होता. पक्षाचे सरचिटणीस रविंद्र पवार यांनी हकालपट्टीचे पत्र जारी केले आहे.