ट्रेंड – चिमुकल्यांचा फ्री स्टाईल डान्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शाळेतील चिमुकल्यांनी केलेल्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पंजाबी बिट साँग ‘ओ हो हो हो.. इष्क तेरा तडपावे’ या गाण्यावर या चिमुकल्यांनी ठेका धरला. त्यांचा डान्स, चेहऱ्यावरील निरागस हावभाव, त्यांचा उत्साह आणि चेहऱ्यावरील हसू पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. हा व्हिडीओ @bobby.dancer_original या इंस्टाग्राम पेजवरून पोस्ट करण्यात आला असून त्याला नेटकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या व्हिडीओला मिलियनमध्ये लाईक्स मिळाले असून हजारो कमेंट्स मिळाल्या आहेत.