IPL 2020 MIvsCSK – मुंबईला रायडूचा तडाखा, चेन्नईचा विजयाने श्रीगणेशा

आयपीएलच्या 13 हंगामातील पहिली लढत आज अबुधाबी येथे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघात खेळली गेली. पहिल्याच लढतीत चेन्नईच्या संघाने गतविजेत्या मुंबईच्या संघाचा विकेट्सने पराभव करत विजयाने श्रीगणेशा केला. मुंबईने विजयासाठी दिलेले 163 धावांकॅगे आव्हान चेन्नईच्या गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. चेन्नई कडून अंबाती रायडू याने तडाखेबाज खेळी करत धावा ठोकल्या.

मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. मुरली विजय 1 आणि शेन वॉटसन 4 धावांवर बाद झाला. मात्र यानंतर रायडू आणि डू प्लेसीस यांनी शतकी भागीदारी करत डाव सावरला. रायडू 71 धावांवर बाद झाला, मात्र डू प्लेसीसने अखेरपर्यंत नाबाद राहत 58 धावा केल्या व संघाला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी मुंबईने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बात 163 धावा केल्या. मुंबई कडून सौरभ तिवारी याने सर्वाधिक 42 धावांची खेळी केली, तर क्विंटन डी कॉक याने 33 धावांचे योगदान दिले. मात्र चांगल्या सुरुवातीनंतरही मधल्या काही षटकात एकामागोमाग एक विकेट्स गमावल्याने मुंबईला अपेक्षेपेक्षा कमी धावसंख्या रचता आली.

चेन्नईकडून एल. निगिडीने सर्वाधिक 3, जडेजा आणि चहरने प्रत्येकी 2 आणि चावला व कुर्रमने प्रत्येकी एक बळी घेतला.

Photo – आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज

आपली प्रतिक्रिया द्या