
बोरिवलीतील मागाठणे येथे लवकरच मालवणी जत्रोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. जत्रेचे यंदाचे 29 वे वर्ष आहे. शिवसेना शाखा क्रमांक 12 च्या वतीने मागाठाणे मित्र मंडळ आणि शाखा क्र. 14 च्या संयुक्त विद्यमाने या मालवणी महोत्सवाचे आयोजन केले असून हा महोत्सव संस्कृती, परंपरा, खाद्यसंस्कृती आणि उत्सवाचा संगम असणार आहे.
शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांच्या हस्ते मालवण गावातील प्रसिद्ध देवस्थानाची हुबेहूब प्रतिकृती असलेल्या मालवणी जत्रोत्सवात मंदिर उभारणीचा शुभारंभ सोहळा पार पडला. यावेळी शिवसेनेचे माजी आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख आणि मागाठाणे मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार मोरे, विभाग संघटक शुभदा शिंदे, नगरसेविका सारिका झोरे, विधानसभाप्रमुख अशोक महामुणकर, उपविभागप्रमुख चेतन कदम, संजय ढोलम, योगेश भोईर, अरुण पवार, रेखा बोऱहाडे, विधानसभा समन्वयक राजू मुल्ला, सिमिंतीनी नारकर, विधानसभा संघटक व सिनेट सदस्य मिलिंद साटम, विधानसभा निरीक्षक व सिनेट सदस्य शशिकांत झोरे, रोहिणी चौगुले, शाखाप्रमुख सचिन मोरे, अभिलाष कोंडविलकर, शाखा संघटक माधुरी खानविलकर, वनिता दळवी, शाखा समन्वयक योगेश देसाई, संजय जोजन, इतिश्री महाडिक आदी उपस्थित होते.



























































