IPL 2020 – CSK चे काही फलंदाज स्वतःला ‘सरकारी नोकर’ समजताहेत, सेहवागने घेतली फिरकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग सोशल मीडियावर सक्रिय आहे. यूएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएल दरम्यान विरु व्हिडीओ शेअर करून खेळाडूंना सल्ला देत असून काहींची फिरकी देखील घेत आहे. सेहवागने चेन्नई सुपर किंग्जच्या खराब कामगिरीवर टिप्पणी केली आहे. काही खेळाडू स्वतःला ‘सरकारी नोकर’ समजत आहेत, असे म्हणत विरूने जे खेळाडू आपल्या स्थान ‘पक्के’ असल्याचे मानतात त्यांना टोला लगावला आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध बुधवारी 168 धावांचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ चांगल्या स्थितीत असतानाही पराभूत झाला. शेन वॉटसन याने अर्धशतकीय खेळीमुळे चेन्नईच्या संघाचा विजय निश्चित दिसत असताना त्यांचा संघ 5 बाद 157 धावा करू शकला आणि 7 धावांनी पराभूत झाला. यंदाच्या आयपीएलमधील चेन्नईचा हा चौथा पराभव आहे.

याच संदर्भात ‘क्रीकबझ’शी बोलताना विरु म्हणाला की, हे आव्हान चेन्नईने लीलया पार करायला हवे होते. मात्र केदार जाधव आणि रवींद्र जडेजा यांनी चेंडू डॉट खेळल्याने संघाचे नुकसान झाले. माझ्या मते चेन्नईचे काही खेळाडू स्वतःला सरकारी नोकर आहेत. त्यांना माहिती आहे की आपण चांगली कामगिरी केली काय, न केली काय, आपला पगार सुरूच राहणार आहे, असा टोला विरुने लगावला.