आयपीएलच्या उर्वरित मोसमासाठी बदली खेळाडूंची घोषणा, बंगळुरूच्या संघात चार बदल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएलचा हिंदुस्थानातील मोसम कोरोनामुळे पूर्ण होऊ शकला नाही. आता आयपीएलचा उर्वरित मोसम येत्या 19 सप्टेंबरपासून यूएईत खेळवण्यात येणार आहे. 15 ऑक्टोबरला या स्पर्धेच्या जेतेपदाचा फैसला होईल. या उर्वरित मोसमासाठी बदली खेळाडूंच्या नावांची घोषणा करण्यात आली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या संघात चार बदल केले आहेत. राजस्थान रॉयल्स व पंजाब किंग्ज या दोन संघांनी प्रत्येकी दोन व कोलकाता नाइट रायडर्सकडून एक बदल करण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज तबरेझ शम्सी हा तब्बल पाच वर्षांनंतर आयपीएलमध्ये सहभागी होणार आहे. राजस्थान रॉयल्सने अॅण्ड्रय़ू टे याच्याऐवजी तबरेझ शम्सीला संघात स्थान दिले आहे. तबरेझ शम्सी याने 2016 साली पार पडलेल्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर तो आता पाच वर्षांनंतर आयपीएलमध्ये खेळणार आहे. आयपीएलच्या लिलावात तबरेझ शम्सीला कोणीही विकत घेतले नव्हते. त्याची मूलभूत किंमत 50 लाख रुपये इतकी होती. दरम्यान, इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू जॉर्ज गार्टन पहिल्यांदाच आयपीएल खेळणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याला संघात घेतले आहे. सिंगापूरचा क्रिकेटपटू टीम डेव्हिड हाही आयपीएलमध्ये खेळणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे तो प्रतिनिधित्व करील.

आयपीएलच्या उर्वरित मोसमात न खेळणारे खेळाडू
अॅडम झाम्पा – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
डॅनियल सॅम्स – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
केन रिचर्डसन – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
फिन अलेन – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
जोफ्रा आर्चर – राजस्थान रॉयल्स
अॅण्ड्रय़ू टे – राजस्थान रॉयल्स
रायली मेरेडीथ – पंजाब किंग्ज
झाय रिचर्डसन – पंजाब किंग्ज
पॅट कमिन्स – कोलकाता नाइट रायडर्स

बदली खेळाडूंची नावे
वनींदू हसारंगा – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
दुशमंता चमीरा – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
जॉर्ज गार्टन – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
टीम डेव्हिड – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
ग्लेन फिलिप्स – राजस्थान रॉयल्स
तबरेझ शम्सी – राजस्थान रॉयल्स
नॅथन इलीस – पंजाब किंग्ज
अदिल रशीद – पंजाब किंग्ज
टीम साऊथी – कोलकाता नाइट रायडर्स