IPL 2021 अखेरच्या चेंडूवर चेन्नईचा थरारक विजय, केकेआरचा पराभव करत अव्वल स्थानी झेप

अखेरच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक झालेल्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा 2 विकेट्सने थरारक पराभव केला. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेमध्ये दिल्ली कॅपिटल्सला मागे सारत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे.

कोलकाताने चेन्नईने विजयासाठी 172 धावांचे आव्हान दिले होते. ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिस यांनी चेन्नईला 74 धावांची सलामी दिली. गायकवाडने 40 तर डू प्लेसिसने 43 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या मोईन अलीने 32 धावा काढल्या. मात्र हे तिघे बाद झाल्यानंतर चेन्नईचा डाव घसरला. परंतु जाडेजाने 8 चेंडूत 22 धावा चोपत संघाला विजयाजवळ पोहोचवले.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने 6 बाद 171 धावा केल्या. राहुल त्रिपाठीने सर्वाधिक 45 धावांचे योगदान दिले. नितेश राणाने नाबाद 37, दिनेश कार्तिकने 25, आंद्रे रसेलने 20 आणि व्यंकटेश अय्यरने 18 धावा केल्या. चेन्नईकडून शार्दुल ठाकूर आणि जोश हेझलवूडने प्रत्येकी दोन, तर रविंद्र जाडेजाने एक बळी घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या