
इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल 2021) मध्ये शनिवारी मुंबई इंडियन्सचा विस्फोटक फलंदाज किरॉन पोलार्ट याने वेगान अर्धशतक ठोकले. दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात झालेल्या लढतीत पोलार्डने अवघ्या 17 चेंडूत अर्धशतकाला गवसणी घातली. यामुळे आयपीएल इतिहासात सर्वात जलद अर्धशतक करणाऱ्यांची चर्चा होणे साहजिक आहे. आयपीएलमध्ये कमी चेंडूत 50 धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंबाबत जाणून घेऊया..
5. क्रिस गेल

‘मिस्टर युनिव्हर्स’ किताब मिरवणाऱ्या क्रिस गेल याने 2013 च्या हंगामात पुणे वॉरिअर्सविरुद्ध 17 चेंडूत अर्धशतक ठोकले होते.
4. सुरेश रैना

चेन्नई सुपर किंग्जचा आधारस्तंभ सुरेश रैना याने 2014 च्या हंगामात पंजाब किंग्जविरुद्ध 16 चेंडूत 50 धावा चोपल्या होत्या.
3. सुनिल नरीन

गोलंदाज म्हणून कारकीर्द सुरु करणाऱ्या सुनिल नरीन याने कोलकाताकडून खेळताना 2017 च्या हंगामात 15 चेंडूत अर्धशतक ठोकून आपण फलंदाजीही करू शकतो हे दाखवून दिले होते.
2. युसुफ पठाण

कोलकाता नाईट रायडर्सकडून मैदान गाजवलेल्या युसुफ पठाण याने 2014 च्या हंगामात 14 चेंडूत अर्धशतक ठोकले होते.
1. केएल. राहुल

पंजाब किंग्जचा खेळाडू केएल राहुल याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 2018 च्या हंगामात अवघ्या 14 चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम केला होता.





























































