जिओ सिनेमाने रचला विश्वविक्रम, आयपीएल फायनलला 12 कोटी दर्शकांचे टय़ून इन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेवटच्या चेंडूपर्यंत प्रेक्षकांचा श्वास रोखणाऱ्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात जिओ सिनेमाने 12 कोटींपेक्षा अधिक दर्शकांचे टय़ून इन मिळवित नवा जागतिक विक्रम नोंदविला. एका सामन्यात किंवा एका थेट प्रक्षेपण असलेल्या कार्यक्रमाला इतके प्रचंड आणि विश्वविक्रमी दर्शक मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

आयपीएलचे अधिकृत डिजिटल स्ट्रिमिंग पार्टनर असलेल्या जिओ सिनेमाने जास्तीत जास्तीत जास्त दर्शकांना आकर्षित करण्यासाठी 12 भाषांमध्ये समालोचन ठेवले होते. त्यामुळे सर्वच भाषांना अभूतपूर्व दर्शकसंख्या लाभली.

जिओ सिनेमाने केलेले विक्रम

  • एकाच दिवशी अडीच कोटींपेक्षा अधिक डाऊनलोड रजिस्टर्ड झाले. यापूर्वी एका दिवशी एका अॅपचे इतकी डाऊनलोडिंग झाली नव्हती.
  • आयपीएलचा अंतिम सामना एकाच वेळी 3.21 कोटी दर्शकांनी पाहिला. हा नवा विश्वविक्रम आहे.
  • सोळाव्या आयपीएलला जिओ सिनेमावर 1700 कोटींपेक्षा अधिक व्यूज मिळाले.
  • जिओ सिनेमाने कोटय़वधी दर्शकांना आपल्याकडे खेचल्यामुळे त्यांच्याशी 26 पुरस्कर्ते आणि 800 पेक्षा अधिक जाहिरातदार जोडले गेले.