IPL 2024 : ‘या’ दोन सामन्यांच्या वेळापत्रकात बदल…वाचा काय आहे कारण

आयपीएलच्या सतराव्या हंगामामध्ये मोठे उलटफेर पाहायला मिळत आहेत. आपापल्या संघाना समर्थन देण्यासाठी चाहते सुद्धा सुट्टीचे नियोजन करुन मैदानामध्ये उपस्थित दाखवत आहेत. अशातच बीसीआयने दोन सामन्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे.

आयपीएल 2024 ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. अशातच आता बीसीआयने आयपीएलच्या दोन सामन्यांचे वेळापत्रक बदलले आहे. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यामध्ये 17 एप्रिल रोजी कोलकात्ताच्या ईडन गार्डन येथे सामना होणार होता. मात्र आता हा सामना एक दिवस आगोदर म्हणजे 16 एप्रिल रोजी कोलकातामध्येच  खेळवणार जाणार आहे. त्याचबरोबर गुजरात टायटन्स (GT) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (DC) यांचा सामना 16 एप्रिल रोजी खेळवण्यात येणार होता. मात्र हा सामना आता 17 एप्रिल रोजी नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे.

एकीकडे आयपीएलमध्ये तुंबळ युद्धा सुरू आहे. तर दुसरीकडे लोकसभेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणामुळे बीसीआयने दोन सामन्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. 17 एप्रिल रोजी श्री रामनवनी असल्यामुळे देशभरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण असणार आहे. त्यामुळे कोलकाता पोलिसांनी 17 एप्रिल रोजी आयपीएलच्या (KKR Vs RR) सामन्याला सुरक्षा देण्यास असमर्थता दर्शवली होती.