
गेल्या वर्षी कोलकात्याला आणि यंदा पंजाबला गुणतालिकेत नंबर वन बनविण्याचा पराक्रम कर्णधार श्रेयस अय्यरने करून दाखवला. प्रियांक आर्य (62) आणि जोश इंग्लिस (73) यांच्या तडाखेबंद 109 धावांच्या भागीने पंजाबला 9 चेंडू व 7 विकेट राखून विजय मिळवून दिला आणि गुणतालिकेत 19 गुणांसह अव्वल स्थान दिले. आता क्वालिफायर वन सामन्यात त्यांची गाठ दुसरे स्थान संपादणाऱया गुजरात किंवा बंगळुरूशी पडेल. आजच्या पराभवामुळे मुंबईचे टॉप टूचे स्वप्न भंग पावले.
मुंबईच्या 185 धावांच्या आव्हानाचा पंजाबच्या आघाडीच्या फलंदाजांनी अक्षरशः खुर्दा पाडला. प्रियांश आर्य आणि जोश इंग्लिसने 60 चेंडूंत 109 धावांची भागी रचत पंजाबचा मोठा विजय निश्चित केला. मुंबईच्या फलंदाजांप्रमाणे ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमरा आणि दीपक चहरने घोर निराशा केली. आर्य-इंग्लिसपुढे मुंबईचे गोलंदाज काहीही करू शकले नाहीत.
रोहित-रिक्लटनची सामान्य सलामी
एकीकडे सारेच संघ किमान 200 धावांचा टप्पा गाठत असताना मुंबईला आजही तो टप्पा गाठता आला नाही. रायन रिकल्टन आणि रोहित शर्मा जोडीने 45 धावांची सलामी दिली. पंजाबच्या अर्शदीप सिंग आणि माकाx यान्सनने आपल्या प्रभावी गोलंदाजीने रायन-रोहितला रोखले. दोघेही विशीतच बाद झाले. त्यानंतर सूर्यकुमार यादवने एकहाती किल्ला लढवत हार्दिक पंडय़ा (26) आणि नमन धीरसह 75 धावांची भर घालत संघाला 180 च्या पुढे नेले. हाणामारीच्या षटकात यान्सन आणि जेमीसनने मुंबईच्या धावांवर बंधने लादली. तरी नमन धीर आणि सूर्याने 19व्या षटकात 23 धावा पह्डून काढल्या. मात्र अर्शदीपने शेवटच्या षटकात सूर्या आणि नमन धीरला बाद करत मुंबईला 184 धावांवरच रोखले. अर्शदीपने दोन विकेट घेत केवळ 3 धावा दिल्या. हेच षटक मुंबईसाठी घातक ठरले.
सूर्यकुमारने सचिनला मागे टाकले
सूर्यकुमार यादवने आयपीएलमध्ये आपल्या धावांचा पाऊस कायम राखताना दुसऱयांदा 600 धावांचा टप्पा गाठला आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या 618 धावांच्या आयपीएल विक्रमालाही मोडीत काढले. आज पंजाबविरुद्ध केलेल्या 57 धावांच्या पाचव्या अर्धशतकी खेळीमुळे यंदाच्या मोसमात सूर्याने 640 धावा केल्या असून आता फलंदाजीत सुदर्शन (679) आणि गिल (649) हे गुजरातचे दोनच फलंदाज त्याच्यापुढे आहेत. सूर्याच्या या अर्धशतकामुळे मुंबईने पंजाबविरुद्ध 185 धावांचे आव्हान उभारले. मुंबईसाठी आजवर सचिन तेंडुलकरनेच 2010 साली सर्वप्रथम 600 धावांचा टप्पा गाठत 618 धावा केल्या होत्या. त्यानंतर 2023मध्ये सूर्याने 605 धावा केल्या होत्या.