IPL 2026 – खेळाडूंनी नाही तर ग्राउंड स्टाफने मैदान मारलं; ACA कडून 25 लाखांचे बक्षीस जाहीर, कारण काय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

IPL 2026 मधील राजस्थान रॉयल्सचे तीन सामने गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियमवर यशस्वीपणे पार पडले. या काळात पावसाचे मोठे संकट असतानाही पिच आणि आउटफील्ड खेळण्यायोग्य ठेवल्याबद्दल ‘आसाम क्रिकेट असोसिएशन’ने (ACA) ग्राउंड स्टाफ आणि क्युरेटरसाठी 25 लाख रुपयांच्या रोख बक्षीसाची घोषणा केली आहे.

मुंबई इंडियन्स, आरसीबी आणि सीएसके विरुद्धच्या सामन्यांमध्ये पावसाने वारंवार व्यत्यय आणला होता. विशेषतः मुंबईविरुद्धचा सामना पावसामुळे प्रत्येकी 11 षटकांचा करावा लागला. मात्र, मैदानातील कर्मचाऱ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळे खेळात मोठा व्यत्यय होऊ दिली नाही. त्यांच्या या मेहनतीमुळे राष्ट्रीय स्तरावर गुवाहाटी मैदानाची प्रतिमा अधिक उंचावली आहे.

जयपुरचे सवाई मानसिंह स्टेडियम नूतनीकरणासाठी बंद असल्याने गुवाहाटीला राजस्थानचे दुसरे होम ग्राउंड बनवण्यात आले होते. आता येथील सामने संपल्यानंतर राजस्थानचा संघ 25 एप्रिलपासून पुन्हा आपल्या मूळ होम ग्राउंडवर (जयपुर) परतणार आहे. असोसिएशनचे अध्यक्ष तरंगा गोगोई आणि सचिव सनातन दास यांनी ग्राऊंड स्टाफला ‘सामन्यांचा कणा’ म्हणत त्यांच्या कष्टांचे कौतुक केले आहे.