IPL 2026: गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्सच्या सामन्यांच्या वेळापत्रकात बदल, वाचा सविस्तर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

BCCI ने IPL 2026 च्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे. गुजरात टायटन्स (GT) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यातील दोन सामन्यांच्या ठिकाणांची आपापसात अदलाबदल करण्यात आली आहे. अहमदाबादमध्ये होणाऱ्या निवडणुकांमुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला असून, चाहत्यांनी या नवीन बदलाची नोंद घेण्याचे आवाहन बोर्डाकडून करण्यात आले आहे.

मूळ वेळापत्रकानुसार, 26 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3.30 वाजता गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामना अहमदाबादमध्ये खेळवला जाणार होता. मात्र, सुधारित वेळापत्रकानुसार हा सामना आता चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) खेळवला जाईल. वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नसून हा सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होईल.

या बदलामुळे, 21 मे 2026 रोजी चेन्नईत होणारा सामना आता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. 26 एप्रिल रोजी अहमदाबाद आणि गुजरातच्या इतर भागांत होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमुळे हा बदल करणे आवश्यक असल्याचे बीसीसीआयचे मानद सचिव देवजित सैकिया यांनी स्पष्ट केले आहे.