
IPL 2026 मधील 21 व्या सामन्यात विदर्भच्या प्रफुल हिंगेने पदार्पण केल आणि पहिल्याच सामन्यात आपल्या धारधार गोलंदाजीने फलंदाजांची तारांबळ उडवली. तुफान फॉर्मात असलेल्या वैभव सूर्यवंशीला प्रफुलने भोपळाही फोडू दिला नाही. पहिल्याच षटकात वैभवने तीन विकेट घेत राजस्थानची सर्व मनसुबे उधळून लावले. प्रफुलला सकीब हुसैनने दमदार साथ दिली त्यानेही 4 षटकांमध्ये 24 धावा देत 4 विकेट घेतल्या. तसेच इशान मलिंगाने 2 विकेट घेत संघाचा विजय जवळपास निश्चित केला. त्यामुळे हैदराबादने दिलेल्या 217 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा संपूर्ण संघ 159 धावांमध्ये बाद झाला आणि हैदराबादने 57 धावांनी सामना जिंकला. राजस्थानकडून रविंद्र जडेजा (45) आणि डोनोव्होन फरेरा (69) दमदार फलंदाजी करत सामन्याच चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला.




























































