कोल्हापूर – आयपीएलवर सट्टा घेणाऱ्यास अटक

दुबई येथे सुरू असलेल्या आयपीएल 2020 मधील कोलकाता नाईट रायडर्स व सनरायझर्स हैदराबाद या क्रिकेट मॅचचे बेटींग घेताना उमेश नंदकुमार शिंदे (वय – 39, रा .आकाशवाणी केंद्राजवळ, सांगली) याला शनिवारी येथील स्था. गुन्हे अन्वेषण शाखेने रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून लॅपटॉप,मोबाइल, एटीएम कार्ड असा 36 हजार 611 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याप्रकरणी उमेश शिंदे व सनी उर्फ मिलिंद शेटे या दोघांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई तावडे हॉटेल परिसरातील तणवाणी हॉटेलमध्ये करण्यात आली. त्याची माहिती आज समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जाऊ लागले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या