
दिग्गज खेळाडू असताना देखील आयपीएलच्या यंदाच्या मोसमात खराब कामगिरी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादचा पाय आणखी खोलात गेला आहे. सनरायझर्स हैदराबादचा प्रमुख गोलंदाज यॉर्कर पिंग टी. नटराजन याच्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला आयपीएल स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. शेवटच्या षटकांची भिस्त ही टी. नटराजन याच्या खांद्यावर असते. मात्र, दुखापतीमुळे तो गेल्या दोन सामन्यांमध्ये देखील संघाच्या बाहेर होता. त्याची दुखापत गंभीर असल्याने तो पुढील सामने खेळू शकणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. यंदाच्या मोसमात सनरायझर्स हैदराबादची सुरूवात निराशाजनक झाली. त्यात आता प्रमुख गोलंदाज संघाच्या बाहेर गेल्यामुळे सनरायझर्स हैदराबादच्या अडचणी वाढल्या आहेत.



























































