इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे नौदलप्रमुख अलीरेझा यांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका आणि इस्रायलने हल्ला केल्यानंतर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी रोखून ठेवली आहे. यामागे ज्यांची सर्वात महत्त्वाची भूमिका होती, ते इराणचे नौदल प्रमुख अलीरेझा टंगसिरी यांना ठार केल्याचा दावा इस्रायलने केला आहे. काल रात्री बंदर अब्बास या शहरावर केलेल्या हवाई हल्ल्यात टंगसिरी ठार झाल्याचे इस्रायलने म्हटले आहे. नौदलाच्याच गुप्तचर खात्याचे प्रमुख बेहनाम रेजाई यांचाही मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे. इराणकडून मात्र त्यास दुजोरा देण्यात आलेला नाही.

अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधान लष्करी कारवाईला सुरुवात करून युद्धाला तोंड पह्डले. त्यानंतर इराणने एक महत्त्वाचे पाऊल उचलत होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली. यामुळे संपूर्ण जगाची ऊर्जा काsंडी झाली आहे. सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेण्यापासून त्यावर नजर ठेवण्यात तसेच लष्करी कारवाईत टंगसिरी यांची भूमिका महत्त्वाची होती.

क्षेपणास्त्राचे अवशेष पडून हिंदुस्थानी नागरिकाचा मृत्यू

इराणने अबुधाबीच्या दिशेने डागलेले क्षेपणास्त्र यूएईच्या हवाई संरक्षण यंत्रणेने गुरुवारी हवेतच उद्ध्वस्त केले. त्याचे अवशेष अंगावर पडून दोघांचा मृत्यू झाला. त्यात एका हिंदुस्थानी तर एका पाकिस्तानी नागरिकाचा समावेश आहे.

आम्हाला विचारून युद्ध सुरू केलं का? जर्मनीने अमेरिकेला फटकारले

इराण युद्धपासून अंतर राखून असलेल्या ‘नाटो’ देशांवर टीका करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना जर्मनीचे संरक्षण मंत्री बोरिस पिस्टोरियस यांनी आज खडे बोल सुनावले. ‘इराण युद्ध ही आर्थिक आपत्ती आहे. आम्ही यात पडून ते चिघळू देणार नाही. हे आमचे युद्ध नाही. युद्ध सुरू करण्याआधी आम्हाला कोणी विचारले नव्हते. या युद्धाचा कुठलाही स्पष्ट हेतू नाही. निश्चित रणनीती नाही. यातून बाहेर पडण्याचा मार्गही अमेरिकेकडे नाही,’ असे पिस्टोरियस म्हणाले.