खूशखबर ! इरफान खान परत येतोय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। लंडन

अभिनेता इरफान खानच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. इरफान लवकरच एका चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. त्याने सुजीत सरकारचा एक चित्रपट साईन केला आहे. ‘डेक्कन क्रोनिकल’ने ही माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी इरफानने इन्स्टाग्रामवर त्याचा फोटो पोस्ट केला होता. त्यात त्याचं वजन कमी झालेलं दिसत असलं तरी तो खुश असल्याचं दिसत होत. त्याच्या या खुश राहण्याचं कारण हा चित्रपट असावा अशी चर्चा आहे.

इरफानच्या या नवीन चित्रपटाचं शुटींग केव्हा सुरू होणार याबद्दल मात्र अद्याप काही सांगण्यात आलेलं नाही. इरफानच्या तब्येतीला झेपेल अशा पद्धतीनेच नवीन चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. दिग्दर्शक विशाल भारद्वाज इरफानच्या तब्येतीची माहिती देत असून त्याच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.” आम्ही रोज एकमेकांना व्हॉट्सअॅपवरुन मेसेज करत असतो. तो त्याचा वेळ क्रिकेट बघण्यात घालवतो, तर कधी तो त्याने गायलेली अंगाईगीत रेकॉर्ड करून मला पाठवतो. सगळ्यांच्या प्रार्थना त्याच्यासोबत असून तो लवकरच पूर्ण बरा होऊन परतणार आहे असेही भारद्वाज यांनी म्हटले आहे”.

इरफान सध्या लंडनमधील रुग्णालयात ‘न्यूरो इंडोक्राइन ट्यूमर’ या आजारावर उपचार घेत आहे. तो अधून मधून त्याच्या सध्याच्या परिस्थितीबदद्ल टि्वट करत असतो. यामुळे त्याच्या प्रत्येक टि्वटची चाहते वाट बघत असतात.

भारद्वाज व इरफान चांगले मित्र आहेत. इरफानने भारव्दाज यांच्या मकबूल, ७ खून माफ, हैदर या चित्रपटात काम केलं आहे. इरफान भारद्वाज यांच्या अजून एका चित्रपटात काम करत असून यात दीपिकाही आहे. पण चित्रपटाच्या शूटींग दरम्यानच त्याची तब्येत बिघडली. यादरम्यान त्याला ‘न्यूरो इंडोक्राइन ट्यूमर’ हा आजार झाल्याचे समजले. यामुळे शुटींग अर्धवट सोडून तो उपचारांसाठी लंडनला रवाना झालाय.