कुर्ला, चेंबूर, गोवंडीतील नाल्यांवर आता लोखंडी जाळ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या झोन-5 मध्ये उघडय़ा नाल्यांमध्ये टाकण्यात येणारा कचरा रोखण्यासाठी नाल्यांवर लोखंडी जाळ्या बसवण्यात येणार आहेत. झोन-5 मधील कुर्ला, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, टिळकनगर भागातील 51 किमीच्या नाल्यांवर लोखंडी जाळय़ा बसवण्यात येणार आहेत. यासाठी पालिका 15 कोटींचा खर्च करणार आहेत.

झोन पाचमध्ये एल विभाग (कुर्ला), एम-पूर्व विभाग (मानखुर्द) आणि एम-पश्चिम विभाग (चेंबूर) या भागांचा समावेश आहे. या परिसरात झोपडपट्टय़ांचे प्रमाण अधिक असल्याने नागरिकांकडून नाल्यांमध्ये कचरा टाकण्याचे प्रकार वारंवार घडतात. यावर उपाय म्हणून मुंबई मराठी झोन पाचमध्ये नाल्याजवळ 10 ते 12 फूट उंच जाळ्या बसवण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे.