इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांचा आकडा 10 वर; मुसळधार पाऊस, डोंगराळ भागामुळे बचावकार्यात अडथळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या इर्शाळवाडीवर बुधवारी रात्री डोंगर कोसळला. यामुळे 40 घरांची वाडी ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून 98 जणांना वाचवण्यात आले आहे.

एनडीआरएफचे पथकं आणि जिल्हा प्रशासनाकडून इर्शाळवाडी येथे बचावकार्य सुरू आहे. अद्यापही काही लोकं ढिगाऱ्याखाली गाडल्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र तुफान पाऊस आणि खराब हवामान यामुळे बचावकार्यात प्रचंड अडथळे येत आहेत.

डोंगराळ भाग असल्याने बचावकार्यात अडचळा येत असून डोंगराच्या पायथ्यापासून दीड तासांच्या अंतरावर असणाऱ्या या वाडीच्या वाटेवर प्रचंड चिखल झालेला आहे. त्यामुळे घटनास्थळी जेसीबी, पोकलेन नेणे शक्य झालेले नाही. सध्या मानवी बचावकार्यातून गावकऱ्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत 30हून अधिक लोकांना वाचवण्यात आल्याचीही माहिती मिळतेय.

इर्शाळवाडी हे गाव डोंगरावर आहे. तिथे जाण्याचा रस्ता अवघड आहे. भूस्खलनानंतर तिथली 48 घरं ढिगाऱ्याखाली गेली. रात्रीच्या सुमारास गिरीश महाजन आणि स्थानिक आमदार येथे पोहोचले. रात्री बचावकार्य करणे शक्य नव्हते, मात्र काही लोकांना बाहेर काढण्यात आले. येथे जेसीबी जावू शकत नाही, त्यामुळे एनडीआरएफ आणि टीडीआरएफची पथके तिथे पोहोचून बचावकार्य सुरू आहे. येथे प्रचंड पाऊस सुरू असल्याने बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

अंबादास दानवे इर्शाळवाडीत दाखल, दुर्घटनेत वाचलेल्यांना भेटून दिला धीर

खराब हवामानामुळे जेसीबी आणि हेलिकॉप्टर घटनास्थळी पोहोचू शकत नाही. आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून या वाडीतील जवळपास 80 लोकं जिवंत असल्याची माहिती मिळतेय. काही लोकं व्यवसाय, कार्यक्रमाच्या निमित्ताने बाहेर गेले होते. त्यामुळे घटना घडली तेव्हा नक्की किती लोकं ढिगाऱ्याखाली आहेत याची खात्रिलायक माहिती नाही. मुख्यमंत्री, मंत्री घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्याचा आढावा घेत आहेत, असेही ते म्हणाले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)