ही बॉलिवूड अभिनेत्री लेस्बियन?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडमध्ये प्रेम प्रकरण, शारीरिक संबंध यांबद्दल कधी गपचूप तर कधी खुल्लमखुल्ला चर्चा होताना दिसते. पण, जाहीररित्या कोणताही सेलिब्रिटी ते मान्य करताना दिसेल असं सांगता येत नाही. तरीही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून अशा चर्चा रंगत राहतात. गेल्या काही दिवसांमध्ये फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा आणि निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांच्यातल्या संबंधाविषयी खुसफूस सुरू होती. आता अजून एका सेलिब्रिटीची भर यात पडली आहे.

amy-jackson-3

ही सेलिब्रिटी म्हणजे अभिनेत्री अॅमी जॅक्सन. अॅमी जॅक्सन सध्या तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आहे. अॅमीने स्वत:च्या सोशल अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोत एमीसोबत तिची मैत्रीण आहे. दोघीही फोटोत अतिशय सुंदर दिसताहेत. एमी मैत्रिणीला मागून अलिंगन देताना यात दिसतेय. पण या फोटोसोबत ‘वाईफ लाईफ’, अशी कॅप्शन अॅमीने या फोटोला दिली आहे. साहजिकचं हा फोटो आणि कॅप्शन पाहून चाहत्यांना अॅमी लेस्बियन तर नाही, असा प्रश्न पडला आहे. अनेक चाहत्यांनी अॅमीला थेट हा सवाल केला आहे. अर्थात अॅमीने अद्याप याचे कुठलेही उत्तर दिलेले नाही.

अॅमीसोबतची फोटोतील मुलगी युकेची मॉडेल नीलम गिल आहे. नीलमनेही अॅमीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे, तिने दिलेले कॅप्शन पाहूनही अनेकांना धक्का बसला आहे. ‘लाईफ बॉल विद वाइफी अॅमी जॅक्सन…’असं तिने लिहिले आहे. या फोटोसोबत तिने दोन वधूंची ईमोजीही टाकली आहे. त्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं आहे.

WifeLife

A post shared by Amy Jackson (@iamamyjackson) on