T20WC मुंबई इंडियन्सच्या ‘या’ खेळाडूमुळं पंतचं टेन्शन वाढलं, यष्टीरक्षक म्हणून ठोकला दावा

इंडियन प्रीमिअर लीगच्या उर्वरित सत्राची सुरुवात 19 सप्टेंबरपासून यूएईमध्ये होत आहे. ही स्पर्धा संपल्यानंतर 17 ऑक्टोबरपासून आयसीसी टी-20 विश्वचषकाला यूएई आणि ओमानमध्ये सुरुवात होईल. आयपीएलही यूएईमध्येच होत असल्याने खेळाडूंना याचा नक्कीच फायदा होईल. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करून विश्वचषकात अंतिम 11 मध्ये स्थान मिळवण्याची चूरस वाढली आहे.

हिंदुस्थानने काही दिवसांपूर्वीच टी-20 वर्ल्डकपसाठी आपला संघ जाहीर केला. या संघात रिषभ पंत आणि ईशान किशन या दोन डावखुऱ्या यष्टीरक्षक फलंदाजांनी निवड करण्यात आली. ईशान किशान हा मुंबई इंडियन्स संघाचा स्टार खेळाडू असून गेल्या काही काळात त्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर सर्वांनाच प्रभावित केले आहे. मात्र रिषभ पंत संघात असल्यामुळे त्याला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. परंतु आयपीएलमध्ये स्वत:ला सिद्ध करून तो पंतच्या जागेवर दावा ठोकू शकतो.

T20WC पाकिस्तानला पुन्हा पराभूत करण्यासाठी अंतिम 11 चा ‘हा’ संघ मैदानात उतरवा!

आयपीएलला सुरुवात होण्यास तीन दिवसांचा कालावधी बाकी असला तरी ईशान किशन आतापासून याच्या तयारीला लागला आहे. फलंदाजीसह तो यष्टीरक्षणातही विशेष मेहनत करताना दिसतोय. मुंबई इंडियन्सने आपल्या सराव सत्राचा एक व्हिडीओ शेअर केला असून यात ईशान किशन यष्ट्यांमागे झेल घेण्याचा सराव करताना दिसतोय.

पंतला टेन्शन

महेंद्रसिंह धोनी याच्यानंतर रिषभ पंत हाच कसोटी, वन डे आणि टी-20 संघातील नियमित यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळत आहे. मात्र ईशान किशन हा देखील एक विस्फोटक फलंदाज असून यष्ट्यांमागे त्याची कामगिरीही चांगली आहे. आयपीएलमध्ये ईशान किशनने दमदार प्रदर्शन केल्यास टी-20 वर्ल्डकपमध्ये तो पंतसाठी आव्हान उभे करू शकतो.

एकेकाळी ‘हा’ फलंदाज होता विराट कोहलीचा खास, रोहितमुळे लागला कारकिर्दीला ब्रेक

वर्ल्डकपसाठी निवड

दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या 23 वर्षीय खेळाडूला टी-20 वर्ल्डकपच्या संघात स्थान मिळाले. संघ व्यवस्थापनाने अनुभवी शिखर धवन याला डावलून तरुण खेळाडू ईशान किशनला संघात घेतले. पदार्पणापासून नंबर तीन किंवा चारवर खेळणाऱ्या ईशानची निवड सलामीवीर खेळाडू म्हणून झाली आहे. 2021 मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या ईशानने पदार्पणाच्या टी-20 आणि वन डे लढतीत अर्धशतकही झळकावले होते.

प्रेक्षकांच्या साक्षीने आयपीएलचा धमाका, स्टेडियम क्षमतेच्या 50 टक्के क्रिकेटप्रेमींना प्रवेश देणार

आपली प्रतिक्रिया द्या