मुंबई, पुणे, ठाणे येथे एनआयएची छापेमारी; ISIS शी संबंधित 13 जणांना अटक

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) एकाचवेळी देशभरामध्ये 44 ठिकाणी छापे टाकले आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे ग्रामिण, ठाणे शहर, मीरा-भायंदर आणि कर्नाटकातील काही ठिकाणी एनआयएने छापे टाकले असून इसिस या दहशतवादी संघटेशी संबंधित 13 जणांना अटक केली आहे. ‘एनआयए’ या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

इसिस या दहशतवादी संघटनेचे देशभरातील नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी एनआयएने शनिवारी सकाळच्या सुमारास एकाचवेळी छापेमारी केली. एनआयनएने पुण्यात दोन ठिकाणी, ठाणे ग्रामिणमध्ये 31 ठिकाणी, ठाणे शहरात 9 ठिकाणी, मिरा भायंदरमध्ये एका ठिकाणी आणि कर्नाटकातील एका ठिकाणी छापे टाकले. छापेमारीदरम्यान एनआयएच्या हाती काही कागदपत्र लागली असून या प्रकरणात 13 जणांना अटक करण्यात आली आहे.