
इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांच्या पत्नी मन्सूरेह खोजस्तेह बागेरजादेह यांचे सोमवारी निधन झाले. मन्सूरेह या दोन दिवसांपूर्वी अमेरिका आणि इस्त्रायली हल्ल्यात जखमी झाल्या होत्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात खामेनी आणि त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांचा मृत्यू झाल्याचे इराणी सरकारी माध्यमांनी म्हटले आहे.
खामेनी यांच्या निधनानंतर इराणने 40 दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. अयातुल्लाह अली खामेनी हे 1989 पासून इराणचे सर्वोच्च राजकीय आणि धार्मिक नेते होते. खामेनी यांच्या कंपाऊंडवर 30 क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांची मुलगी, जावई, सून आणि नात यांच्यासह 40 कमांडर ठार झाले.
मन्सूरेह खोजस्तेह बागेरजादेह (79) यांचा जन्म इराणमधील मशहाद येथे झाला. त्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ब्रॉडकास्टिंग (IRIB) चे माजी उपसंचालक हसन खोजस्तेह बागेरजादेह यांच्या बहिण होत्या. अमेरिका आणि इस्रायलने हल्ला केला तेव्हा खामेनी यांच्या पत्नीही त्यांच्यासोबत तेहरानमधील खामेनींच्या कंपाऊंडमध्ये उपस्थित होत्या.
























































