
कर्नाटकातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ हम्पी येथे इस्रायली पर्यटक महिलेसह दोन महिलांवरील सामूहिक बलात्कार आणि एका पर्यटकाची हत्या केल्याच्या आरोपाखाली तीन नराधमांना कोप्पल जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. 6 मार्च 2025च्या रात्री ही धक्कादायक घटना घडली होती.
मल्लेश उर्फ हांडीमल्ला, शरणबसव आणि चैतन्य साई अशी आरोपींची नावे आहेत. तुंगभद्रा डाव्या कालव्याजवळ ही घटना घडली होती. होम स्टे मालकिणीसह महाराष्ट्रातील पर्यटक पंकज, ओडिशातील बिभास कुमार, अमेरिकी पर्यटक डॅनियल आणि इस्रायली महिला रात्री 10.30च्या सुमारास आकाशदर्शनासाठी गेले होते. तिथे बाईकवरून आलेल्या आरोपींनी प्रथम पैशावरून वाद घातला. त्यानंतर पंकज, बिभास आणि डॅनियल या तिघांना कालव्यात ढकलले. त्यातील बिभासचा बुडून मृत्यू झाला. याचदरम्यान या नराधमांनी इस्रायली महिला आणि होम स्टे मालकिणीवर बलात्कार केला.































































