
दहशतवादविरोधी कारवाया केल्या रफत अल करवी याला इस्त्रायलमध्ये 15 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. या 15 वर्षात त्याने कधीच तुरुंगाबाहेर पाऊल ठेवले नाही. मात्र सुटून आल्यावर त्याने एक धक्कादायक दावा केला आहे. या 15 वर्षात त्याने चार मुलांना जन्म दिला असून त्यासाठी तो तुरुंगातून त्याचे शुक्राणू पत्नीपर्यंत पोहोचवत होता असे सांगितले.
रफत अल करवी हा अल अक्सा शहीद ब्रिगेड या दहशतवादी संघटनेत होता. 2006 मध्ये त्याला इस्त्रायलमध्ये दहशतवादी कारावाया केल्या म्हणून अटक करण्यात आली होती. याप्रकरणी त्याला 15 वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला होता. काही दिवसांपूर्वीच रफत शिक्षा भोगून बाहेर पडला असून बाहेर आल्यानंतर त्याने स्वत:बाबत एक धक्कादायक दावा केला आहे. त्याच्या या दाव्याने इस्त्रायलमध्ये खळबळ उडाली असून रफत ज्या तुरुंगात होता तेथील अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे.
याने एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे. ‘मी तुरुंगात कैद असताना कँटीनमधील वेफर्सच्या पाकिटात भरून माझे शुक्राणू तुरुंगाबाहेर पाठवायचो. माझ्या सारखे अनेक कैदी असे करायचे. प्रत्येकाच्या पाकिटावर त्याचं नाव असायचं. त्यानुसार ते त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहचवलं जायचं’, असा दावा रफत अल करवी याने केला आहे.




























































