
दिवाळीपूर्वी हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटायला सुरुवात करा; अन्यथा पुन्हा सरकारसाठी आंदोलनाचा वाईट दिवस येईल. आज करू, उद्या करू असे म्हणाल तर फडणवीस आणि विखे, तुमच्या नरड्यावर येईन. पळायलाही जागा उरणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात ते पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले की, मराठ्यांच्या आरक्षणाला फाटा दिला जाईल असं पाऊल मुख्यमंत्र्यांनी उचलायचं नाही. आमचं आरक्षण हक्काचं आहे. जातीयवादी नेत्यांचे ऐकून मराठ्यांच्या पोरांचे वाटोळे होईल असे करू नये. विजय वडेट्टीवार म्हणतायत, मराठा आरक्षणासाठी केलेला जीआर रद्द करण्याची आमची मागणी आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले की, ‘त्याचं कोण ऐकतंय. दिल्लीतून सांगितले असेल, मराठ्यांच्या वि-रोधात बोल म्हणून. काँग्रेस मराठ्यांच्या विरोधात जास्त बोलतेय’ असे ते म्हणाले.
हैदराबाद गॅझेटीअरआधारे जीआर काढलाय. आमची पण मागणी आहे, १९९४ चा जीआर रद्द करा. वरचे २ टक्के आरक्षण ते पण रद्द करा. काही म्हणतात की, आम्ही बंजारा समाजासारखे दिसतो, म्हणून बंजारा समाजाचे आरक्षण घेतले. ते बंजारा समाजासारखे दिसत नाहीत. त्यांना बाहेर काढा. यापुढे जशाला तसे उत्तर देणार, असा इशाराही त्यांनी दिला.