
आरोपी मध्यरात्री इतर कुटुंबीय असताना पीडितेच्या घरात शिरला, तिच्या बाजूला झोपला व तिने कोणताही आरडाओरडा, प्रतिकार न करताच तिच्यावर लैंगिक अत्याचार करत पळून गेला, यावर विश्वास ठेवणे कठीण असल्याचे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने पोक्सोतील एका आरोपीला जामीन मंजूर केला. या गुन्ह्याप्रकरणी आरोपीला सत्र न्यायालयाने 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली होती.
आरोपी 20 वर्षांचा तरुण असून मध्यरात्री तो १५ वर्षे वयाच्या पीडितेच्या घरी मध्यरात्री पहिल्या मजल्यावर गेला व तिच्यावर त्याने लैंगिक अत्याचार केला या आरोपावरून पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी जामीन मिळावा यासाठी आरोपीने हायकोर्टात अॅड. विवेक आरोटे, अॅड. अक्षय डिंगळे यांच्यामार्फत याचिका दाखल केली. त्या याचिकेवर न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. घरातील सर्व सदस्य उपस्थित असताना आरोपी पळून जाणे शक्य नाही. याशिवाय हा प्रकार घडत असताना पीडितेने आरडाओरडा केला नाही. इतकेच काय तर वैद्यकीय पुरावे पीडितेच्या साक्षीला समर्थन देत नाही असे निरीक्षण नोंदवत हायकोर्टाने अर्जदाराचा जामीन मंजूर केला.