IT मधील ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांच्या 1 लाखाचे केले 8 लाख, वर्षभरात 837 टक्के रिटर्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेअर मार्केट सध्या प्रचंड तेजीत असून गेल्या आठवड्यात सेन्सेक्सने 53 हजारांची पातळीही ओलांडली होती. मात्र गुरुवारी आणि शुक्रवारी बाजार मंदित गेला. असे असले तरी गेल्या वर्षभरामध्ये अनेक शेअर्सने गुंतवणूकदारांना प्रचंड फायदा मिळवून दिला आहे. यातील एक शेअर म्हणजे सुबेक्स.

आयटी स्टॉक सुबेक्स (Subex)ने वर्षभरात गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. बंगळुरु येथील या सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअरचा भाव 9 जुलै 2020 रोजी 7.82 रुपये होता. शुक्रवारी एनएसईवर या शेअरचा भाव 71.15 रुपयांवर पोहोचला. याचा अर्थ गेल्या वर्षभरात या शेअरने तब्बल 837.34 टक्के रिटर्न दिले आहेत. तर गेल्या सहा महिन्यात हा शेअर दीड पट झाला आहे.

मार्केटशी ‘सामना’ – झुनझुनवालांच्या पोर्टफोलियोत असणाऱ्या ‘या’ शेअरने वर्षभरात दिले 190 टक्के रिटर्न

2021 मध्ये गुंतवणूकादांचा खिसा भरणाऱ्या स्टॉकमध्ये सुबेक्सचे नाव आघाडीवर आहे. गेल्या वर्षी गुंतवणूकादारांनी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे वर्षभरात 8.37 लाख रुपये झाले असते. तसेच सहा महिन्यांपूर्वीही देखील 1 लाख गुंतवले असते तर त्याचे अडीच लाख झाले असते.

सुबेक्स – 71.15 रुपये (शुक्रवार 9 जुलै, 2020 चा भाव)
मार्केट कॅप – 3750 कोटी रुपये