
सामना ऑनलाईन। श्रीनगर
जम्मू-कश्मीरमधील कुलगाम येथे सकाळपासून सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू असून यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. कुलगाममधील गोपालपोरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर या भागात सुरक्षा दलाने शोध मोहिम हाती घेतली. याच मोहिमेदरम्यान बुधवारी सकाळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यास प्रत्युत्तर देताना जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.
#UPDATE Two terrorists killed by security forces in Gopalpora area of Kulgam. #JammuAndKashmir https://t.co/0JGXeC65a4
— ANI (@ANI) May 22, 2019

























































