Recipe : फणसाची भाजी

561

साहित्य –
कच्चा फणसाचे गरे 25-30, फणसाच्या आठळ्या (बिया) 30, 1 वाटी ओलं खोबरं, 6-7 लाल सुक्या मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या, अर्धा टीस्पून हळद, दीड टेबलस्पून तेल, 1 टीस्पून धणे, कोथींबिर, चवीपुरते मीठ

कृती –
प्रथम कच्चा फणसाचे गरे साफ करून त्यांचे छोटे काप करून घ्यावे. आठळ्या सोलून त्याचे छोटे तुकडे करावे. गॅसवर एका भांड्यात गऱ्यांचे काप व त्यात हळद टाकून मंद आचेवर वाफवून घ्यावे. दुसऱ्या भांड्यात पाणी घेऊन आठळ्या उकडून घ्याव्यात. दोन्ही गोष्टी शिजल्यावर त्यांना एकत्र करून मिश्रण थंड करण्यास ठेवावे.

एका भांड्यांत फोडणीकरता तेल गरम करून त्यात लसूण, धणे आणि लाल मिरच्यांचे तुकडे करून फोडणी तयार करावी. फोडणी तडतडल्यावर गॅस बंद करून फोडणी खलबत्याने जाडसर कुटून घ्यावी. मग ती फोडणी थंड झालेल्या गऱ्यांच्या मिश्रणावर ओतावी आणि मंद आचेवर सर्व मिश्रण एकत्रित करून एक वाफ काढावी. मग त्यात चवीनुसार मीठ टाकावे आणि त्यावर गार्निशिंगसाठी ओले खोबरे आणि कोथींबिर भुरभुरून भाजी सर्व्ह करावी.

आपली प्रतिक्रिया द्या