Lok Sabha Election 2024 : प्रचारादरम्यान झालेल्या दगडफेकीत जगन मोहन रेड्डी जखमी

आंध्र प्रदेशमध्ये लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराने हिंसक वळण घेतले. राज्याचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी हे विजयवाडा येथे प्रचार करत असताना त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत जगन मोहन रेड्डी हे जखमी झाले आहेत. रेड्डी यांच्या डोळ्याच्या वर दगड लागला असून तत्काळ त्यांच्यावर उपचार करण्यात आले.