गायीला गूळ का खाऊ घालतात; जाणून घ्या कारण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गाय, म्हैस या पाळीव प्राण्यांना गूळ खाऊ घालणे फायदेशीर ठरते. गुळात कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि आयर्न यासारख्या खनिजांचा समृद्ध स्त्रोत आहे. यामुळे प्राण्यांच्या वाढीसाठी गुळातील हे गुणधर्म फायदेशीर ठरतात.

– गुळामुळे गायी, म्हशीच्या पचन संस्थेत सुधारणा होण्यासाठी मदत होते. याशिवाय दुधाच्या उत्पादनाची क्षमताही वाढते.

– गुळात अँण्टीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे गाय, म्हशींचे संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण व्हायला मदत होते.

– गाई-गुरांचे थंडीपासून संरक्षण होण्यासाठी गूळ खाऊ घालण्याचा प्रयोग करून बघू शकता. गुळामुळे त्यांच्या शरीरातलील उष्णता वाढते.

– गुळात आयर्न असल्यामुळे प्राण्यांना येणारे दूध स्वच्छ राहण्यास मदत होते.

– गायी-म्हशींना त्यांच्या प्रसुतीच्या काळात गूळ खाऊ घातल्यास त्यांच्या पोटातून बाहेर पडणारे विषारी पदार्थ मलाद्वारे त्यांच्या शरीरातून बाहेर पडतात.

– उन्हाळ्याच्या दिवसांत या पाळीव प्राण्यांना कमी प्रमाणात गूळ खाऊ घाला. यामुळे गूळ उष्ण असतो. यामुळे त्यांच्या शरीरात उष्णता निर्माण होण्याची शक्यता असते.

– तुम्ही पाळलेल्या पाळीव प्राण्याला किती प्रमाणात गूळ खाऊ घालणे गरजेचे आहे, याबाबत तुमच्या पशुवैद्यकांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.