Tips – गुळाचे हे फायदे वाचाल तर साखर खाणे सोडून द्याल

3747

हिंदुस्थानामध्ये आजही ग्रामिण भागात साखरेऐवजी गुळाचा वापर अधिक होतो. जेवणानंतर गूळ खाण्याची प्राचिन पद्धतही हिंदुस्थानात रूढ आहे. परंतु ‘साखरेचे खाणार त्याला देव नेणार’ असेही आपण ऐकले असेलच.

jaggery4

साखरेऐवजी गुळ खाणे अधिक योग्य. गुळ हा चविला गोड असतोच परंतु त्यामुळे आपली पचनक्रियाही सुधारते. त्यामुळे जेवणानंतर गुळ खाल्ल्यास अन्न पचण्यासही मदत होते, असे एक अहवाल सांगतो.

jaggery2

थंडीच्या दिवसांमध्ये गुळ खाणे चांगले असते. गुळामुळे थंडीपासून संरक्षण होते. तसेच सर्दी आणि खोकला झाल्यास आजही घरातील जुनी लोकं गुळ आणि हळद खाण्याचा सल्ला देतात. किंवा दुधामध्ये गुळ आणि हळ मिसळून पिण्याचा सल्ला देतात.

jaggery6

थंडीत गुळाचे लाडू, गुळ-तिळाचे लाडू, गुळ आणि शेंगदाणे, गुळ आणि फुटाणे खाण्यास दिले जातात. यामुळे थंडीपासून संरक्षण होते आणि तब्येतही सुदृढ राहते.

jaggery5

पूर्वीच्या काळी चहापासून ते शिरा बनवण्यापर्यंत प्रत्येक गोड पदार्थात साखरेऐवजी गुळाचा वापर केला जायचा. उन्हातून आल्यास गुळ खाण्यास दिला जायचा आणि त्यानंतर पाणी. शरिराला गारवा मिळण्यास यामुळे मदत होते.

jaggery7

गुळ साखरेपेक्षा फायदेशीर आहे. गुळामध्ये कॅल्शियम आणि लोह जास्त प्रमाणात असल्यामुळे शरिरात साखरेचे प्रमाण संतुलित राहते.

jaggery

गुळामुळे चेहऱ्यावरील डाग नष्ट करण्यासाठी मदत होते. गुळाचा नियमित वापर केल्याने चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर होतात आणि चेहरा सतेज होतो.

jaggery1

आपली प्रतिक्रिया द्या