
पश्चिम रेल्वेच्या सर्वात मोठ्या जगजीवन राम रुग्णालयातून 12 ऑगस्टपर्यंत 1296 कोविडबाधित उपचार होऊन घरी पाठविण्यात आले आहेत. सध्या या रूग्णालयात १३९ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असून रूग्णांचे वर्गीकरण करणे, तसेच त्यांच्या देखभालीसाठी जगजीवन राम रुग्णालयाने अनोखे मोबाईल अॅप विकसित केले आहे.
या जेआरएच नावाच्या मोबाईल अॅपद्वारे या रुग्णालयात रुग्ण दाखल होण्यापासून ते डिस्चार्ज होईपर्यंतचा कोविड १९ चा पूर्ण लेखा जोखा राखणे सोपे झाले आहे. या अॅपमध्ये तयार केलेल्या डेटाबेसमुळे रुग्णाची माहिती साठविण्याबरोबरच आजाराची स्थिती, प्रारंभिक लक्षणे, फिजिकल एक्स्पोजर डिटेल्स, लॅब रिपोर्ट आदी सुविधा एका क्लिकवर उपलब्ध होते. संबंधित व्यक्तींना वेगवेगळ्या टप्प्यांवर दिनांक आणि वेळच्या स्टँम्पसह या डेटाला ऑन लाईन लॉग करता येते. हे अॅप जेआरएचचा चिकित्सा विभाग पश्चिम रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनच्या आयटी सेलने संयुक्तपणे विकसित केले असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्वâ अधिकारी सुमीत ठाकूर यांनी सांगितले.


























































