स्वामींच्या देवत्वाला मिळणार आव्हान

‘जय जय स्वामी समर्थ’ या लोकप्रिय मालिकेत स्वामींच्या लीला हा दैवी अनुभूतीचा साक्षात्कार दर्शवणारा भाग रंगणार आहे. यात एक स्वामींची जगावेगळी लीला पाहायला मिळणार आहे. गोविंदपंत हा स्वामींचा शोध घेणारा माणूस स्वामी स्थानावर येत स्वामी हे परब्रम्ह स्वरूप नाहीत, तर अत्यंत सर्वसामान्य व्यक्ती आहेत, असा दावा करतो. तसेच पुढच्या 24 तासांत पाच गोष्टी, पाच परीक्षा हे सिद्ध करतील असे जाहीर करतो.

स्वामी त्याचे हे आव्हान स्वीकारतात आणि देवत्वाला आव्हान असलेल्या या पाच परीक्षा सुरू होतात. या पाच परीक्षा कोणत्या आणि या दैवी लीलेतून स्वामी कोणता संदेश देणार हे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आजवर स्वामींच्या दैवत्वाला कधीही थेट आव्हान मिळालेले नाही, परंतु आता ते गोविंदपंतानी दिले असून स्वामींनी ते स्वीकारले आहे. या आव्हानाला स्वामी सामोरे कसे जातील हे या मालिकेच्या महाएपिसोडमध्ये पाहायला मिळेल. हा भाग आज दुपारी 2 व रात्री 8 वाजता कलर्स मराठीवर पाहता येईल.