आमची अण्वस्त्र दिवाळीसाठी राखून ठेवलेली नाहीत!-मोदी यांचा पाकिस्तानला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pm-modi-new

सामना ऑनलाईन। जयपूर

आम्ही दिवाळीसाठी आमच्याकडील अण्वस्त्र ठेवलेली नाहीत अशा स्पष्ट शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला रविवारी ठणकावून सांगितले. राजस्थानमधील बाडमेर येथील प्रचारसभेत बोलताना त्यांनी हा इशारा पाकडय़ांना दिला.

आमच्याकडे अण्वस्त्रचे बटण आहे अशा धमक्या पाकिस्तानने हिंदुस्थानला यापूर्वी अधूनमधून दिलेल्या आहेत. याकडे लक्ष वेधून मोदी पुढे म्हणाले, आमच्याकडे मग काय आहे? आम्ही ती (अण्वस्त्र) काय दिवाळीसाठी राखून ठेवलेली नाहीत. मात्र पाकिस्तानच्या या धमक्यांना आम्ही घाबरत नाही, असेही मोदी यांनी पाकला सुनावले.

हिंदुस्थान आज युद्ध न करता पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांना ठार करीत आहे. आम्ही दहशतवाद्यांच्या मनात दहशत निर्माण केली आहे. पाकिस्तानला मिळालेल्या खुल्या सुटमुळे देशात दहशतवादी हल्ले सामान्य गोष्ट बनली होती. आपल्या मतांमुळेच हे दहशतवादी हल्ले कमी झाले आहेत. आम्ही दहशतवाद्यांची मस्ती जिरवली आहे. त्यांना कटोरा घेऊन फिरण्यास भाग पाडले आहे, असे मोदी यांनी सांगितले.