जैश-ए-मोहम्मद अयोध्येवर हल्ला करण्याच्या तयारीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने अयोध्या शहरात दहशतवादी हल्ले घडविण्याचा प्लान तयार केला आहे. या संघटनेचे सात दहशतवादी नेपाल बॉर्डर मार्गे उत्तर प्रदेशमध्ये घुसले असून ते अयोध्या व गोरखपूरमध्ये लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या सात जणांना जैशचा म्होरक्या मसूद अझहरने टेलिग्रामवरून या हल्ल्याची योजना सांगितल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर अयोध्येतील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या बाजूने लागलेल्या निकालानंतर या शहरातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. या प्रकरणाचा निकाल राम मंदिराच्या बाजूने लागल्याने काही दहशतवादी संघटनांनी अयोध्येत घातपाल घडविण्याचा प्लान केला आहे. त्यासाठी अबू हमजा, मोहम्मद याकूब, निसार अहमद, मोहम्मद शाहबाज, मोहम्मद चौधर या पाच जणांसह सात जण उत्तर प्रदेशात घुसले आहेत.