दिल्लीत घुसले जैशचे दहशतवादी, शोधमोहीम सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजधानी दिल्लीत नवरात्रीच्या पार्श्वभुमीवर दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. गुप्तचर यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीत जैश ए मोहम्मदचे तीन ते चार दहशतवादी घुसले आहेत. सर्व दहशतवाद्यांकडे हत्यारे असल्याची माहिती आहे. ही माहिती मिळतचात दिल्ली पोलिसांनी ठिकठिकाणी छापेमारी केली आहे. अजूनही शोध मोहीम सुरू आहे.

दहशतवादी घुसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे. सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बस स्टँड, रेल्वे स्टेशन आणि मेट्रो स्थानकांवर अतिरिक्त पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे.