जालन्यात कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या 35 जणांचे स्वॅब नमूने घेतले

724

जालना शहरातील दु:खीनगर भागातील 65 वर्षीय महिला रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे जिल्हा शल्य चिकित्स यांच्या अहवालानुसार निष्पन्न झाले आहे. या रुग्णाची हैदराबाद प्रवासाची तर त्यांच्या नातेवाईकांचा दिल्ली प्रवासाचा इतिहास असल्याचे समजले. या  रुग्णास 31 मार्च  रोजी डॅा.बद्रुद्दीन रुग्णालय दु:खीनगर व निरामय रुग्णालय जालना या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. निरामय रुग्णालय जालना यांनी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठविले असता  3 एप्रिल रोजी ते रुग्ण दाखल झाले असता त्यांना विलगीकरण कक्षात दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. तातडीची खबरदारीची उपाययोजना म्हणुन या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या तपासण्या व विलगीकरणाची कार्यवाही प्रशासनाकडुन केली जात आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील 15 व्यक्ती, डॉ. बद्रुद्दीन रुग्णालयातील 6, निरामय रुग्णालयातील 14 असे एकुण 35 व्यक्तींचे स्वॅबचे नमुने घेण्यात येणार असून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येतील. तसेच सामान्य रुग्णालयातील रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 20 कर्मचार्‍यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड येथील 26 नागरीकांची खबरदारीची उपाययोजना म्हणुन सामान्य रुग्णालय  जालना येथे शनिवारी तपासणीसाठी आणण्यात आले होते. त्यांच स्वॅबचे नमुने पुणे येथे पाठविण्यात आले असता त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यांचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. शनिवारी शहागड येथील 20 व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे.

जालना जिल्ह्यात सोमवारी 37 रुग्ण नव्याने दाखल झाले आहे आतापर्यंत एकुण 213 रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल होते त्यापैकी 213 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यापैकी 175 रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले आहे. यात 171 निगेटिव्ह व 1 रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 3 नमूने रिजेक्ट केले. 38 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. आज रोजी 94 रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल असून एका रुग्णाची प्रकृती गंभीर आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या