जालना – गोदावरी कोपली, पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेतकऱ्यांची धावाधाव

जालना जिल्ह्यातील गोदावरीला पूर येऊन नदीचे पाणी लगतच्या शेतात शिरल्याने शेतात गुडघ्याएवढे पाणी साचले होते. पिकात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांत धावाधाव झाली.

शुक्रवारी सबंध मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जायकवाडीचे सर्व दरवाजे उघडून मोठ्या प्रमाणात पाणी गोदापात्रात सोडण्यात आले होते. तसेच इतरही गोदावरी नदीला मिळणाNया नद्यांना पूर आल्याने गोदावरीचा जलफुगवटा वाढला होता. नदीवरील जोगलादेवी येथील बंधाऱ्यातून शनिवारी १ लाख ७७ हजार क्यूसेक प्रती सेकंद पाणी प्रवाहित झाल्याने गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडून नजीकच्या शेतात घुसले होते. घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी, रामसगाव, शेवता, बानेगाव, भोगगाव, मंगरूळ, मुद्रेगाव आदी गोदाकाठच्या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी साचल्याने ऊस, कापूस, सोयाबीन, तूर यासह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी रामसगाव येथील बबन भालेकर, रवींद्र बोबडे, रामेश्वर गुंजकर, परमेश्वर भालेकर, ईश्वर तरमाळे, बानेगाव येथील दत्तात्रय उढाण, भोगगाव येथील अमित मुळे, साडेगाव येथील कृष्णा होंडे या शेतकऱ्यांनी केली आहे. घनसावंगी तालुक्यातील रामसगाव येथील कपाशीच्या शेतात पाणी साचले,तर तिसरा फोटो बानेगाव येथील दत्तात्रय उढाण यांच्या मोसंबीच्या बागेत गुडघाभर पाणी सचलेले दिसत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या